नाशिक :- एका ॲपचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली एका अज्ञात सायबर भामट्याने एका वृद्धेची साडेदहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली नोंद अशी, की फिर्यादी महिला ऑनलाईन काही तरी ॲप सर्च करीत होती. त्यादरम्यान 7864049613 या क्रमांकावरून अज्ञात मोबाईलधारकाने या महिलेशी संपर्क साधला. त्यांना डिझ्ने + हॉट स्टार या ॲपचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली संपर्क साधला. त्यादरम्यान गुगलद्वारे प्राप्त झालेल्या मोबाईलवर संपर्क करून अज्ञात इसमाने वृद्ध महिलेचा एनीडेस्क रिमोट ॲपद्वारे महिलेच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यातून कस्टमर आयडीचा शोध लावला.