याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिला व आरोपी नीलेश अर्जुन दळवी (रा. ध्रुवनगर, नाशिक) हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी नीलेश दळवी याने पीडित महिलेला फिरायला नेण्याचा बहाणा करून घोटी येथील हॉटेल विवांत रिसॉर्ट येथे नेले.
तेथे नेल्यानंतर दळवी याने पीडितेला तिची इच्छा नसताना बळजबरीने दारू पाजून “तुझ्याशी लग्न करायचे आहे,” असे सांगून त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडितेला “तुझे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे आहेत. मी ते व्हायरल करीन,” अशी धमकी देऊन आरोपी दळवी याने पीडितेला पुन्हा मुंबई नाक्यावरील एका हॉटेलमध्ये नेऊन तेथेही बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या गोष्टीला विरोध केला असता आरोपी नीलेश दळवी याने पीडितेच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून धमकी दिली. हा प्रकार जुलै 2022 पासून सुरू होता. या प्रकाराला कंटाळून पीडितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी नीलेश अर्जुन दळवी याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.