चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त

मंगळवार, 14 जुलै 2020 (08:50 IST)
मुंबई, ठाण्यासह कोकणात आजपासून चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील चार दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.
 
भारतीय हवामान खात्याचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी पावसाबद्दल माहिती दिली आहे. आगामी चार दिवस राज्यात मध्यम पाऊस असेल. रडार व उपग्रह तशी स्थिती दर्शवत आहेत. असं त्यांनी ट्विट केलं आहे. तसेच, आयएमडी मॉडेल नुसार मंगळवार आणि बुधवार, १४ व १५ जुलै रोजी, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून पावसाची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती