लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मोठ्या शहरांमध्ये पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. नवी मुंबई आणि परिसरातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नवी मुंबई शहरात 29 तारखेपासून लॉकडाऊन लागू होणार असून 7 दिवसांसाठी हा लॉकडाऊन (7 day lockdown in mumbai)असणार आहे.
पण यामुळे या संकटमय परिस्थितीत कोविड योद्धे म्हणून काम करणा-या या सनदी अधिका-यांचे मनोधैर्य खचू लागले आहे. जर आयुक्तांची बदली करण्याचा न्याय सरकार लावणार असेल तर संबंधित जिल्ह्याचा पालक मंत्री व त्या खात्यांच्या मंत्र्यांना जबाबदार धरून त्यांचाही राजीनामा सरकार घेणार का असा रोखठोक सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
नवी मुंबई महापालिका परिसरात गेल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या वाढत्या प्राद्रुर्भावाचा आढावा घेऊन सद्यस्थिती काय आहे, महापालिका कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत, आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे कार्यान्वित होत आहेत आदि विषयां सदर्भात दरेकर यांनी तपशीलवार माहिती घेतली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात बैठक आयोजित करून आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि महापालिका प्रशासनाकडून कोरोना संदर्भात सविस्तर माहिती घेण्यात आली.