औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ८ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा
औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनदरम्यान वाळूज येथील सर्व उद्योगही बंद ठेवले जणार आहेत. या बंददरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेबाबतचे सर्व निर्णय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांसमवेत लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस खासदार इम्तियाज जलील यांची मात्र अनुपस्थिती होती.
लोकप्रतिनिधींसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये लॉकडाउन कसा असावा, यावर चर्चा झाली असून हा लॉकडाउन अधिक कडक असेल, असे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातील जवळपास सर्व भागामध्ये करोना रुग्ण आढळत आहेत.