मुंबई मध्ये गोल्ड स्मगलिंगचे एक मोठे सिंडिकेट DRI ने खुलासा केला आहे. दरी ने धातू वितळवनाऱ्या एका प्लांट मधून मोठ्या प्रमाणात विदेशी सोने आणि चांदी सोबत कमीतकमी 2 लाख यूएस डॉलर जप्त केले आहे. सोबतच दोन आफ्रिकन नागरिकांनसोबत चार लोकांना अटक करण्यात आली आहे. हे लोक विदेशी सोने आणून त्याला वितळवत होते आणि त्याला प्रोसेस्ड केले जात होते. मग याला जवळच्या मार्केटमध्ये विकायला पाठवले जात होते.
मुंबई मध्ये डायरेक्ट्रेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंस (DRI) ने गोल्ड स्मगलिंग सिंडिकेट चे प्रकरण उघडकीस आणले आहे. सोबतच 10.48 करोडचे सोने-चांदी, कॅश आणि महाग सामान जप्त करण्यात आले आहे. DRI च्या अधिकाराने सांगितले की, यामध्ये दोन आफ्रिकन आणि चार लोकांना अटक करण्यात आली आहे. या चौघांना सर्च ऑपरेशन दरम्यान पकडले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार DRI अधिकाराने सांगितले की, सोमवारी दक्षिण मुंबईच्या एक सोने वितळवणाऱ्या वर्कशॉप मध्ये शोध अभियान दरम्यान दोन आफ्रिकी नागरिकांसोबत चार जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकारींनी सांगितले की, हे ओक आफ्रिकामधून सोने स्मगलिंग करून मुंबईला आणत होते.
मिळलेल्या माहितीनुसार, मेल्टिंग फॅसिलिटीमध्ये शोध मोहीम राबवली गेली. तिथे DRI च्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये विदेशातून येणारे 9.31 किलो सोने आणि 16.66 किलो चांदी मिळाली आहे. अधिकारींनी धातू वितळवणाऱ्या प्लांटच्या संचालकाला ताब्यात घेतले, हा संचालक विदेशी नागरिकांकडून सोन्याची तस्करी करीत होता व तिथून इथपर्यंत आणण्यासाठी सर्व व्यवस्था करीत असे व ते सोने वितळवून लोकल बाजारात विकण्यासाठी पाठवत होता. तसेच आरोपींची चौकशी केल्यानंतर मेल्टिंग फॅसिलिटी आणि रिक्रुटरच्या ऑफिसची झडती घेण्यात आली तर त्यामध्ये DRI ने 190000 यूएस डॉलर जप्त केलेत. अटक केल्यानंतर आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला आहे.