सुनेत्रा पवारांना पोलिसांकडून मोठा दिलासा!

बुधवार, 24 एप्रिल 2024 (13:07 IST)
सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा महायुतीच्या उमेदवार असून यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडून शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. हा घोटाळा तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा असून यामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार रोहित पवार यांना देखील दिलासा मिळाला असून हे शरद पवार गटाचे आमदार आहेत. 
 
एक मोठी बातमी शिखर बँक घोटाळा प्रकरणात समोर आली असून, अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा महायुतीच्या उमेदवार आहे. तसेच ही क्लीन चिट मुमबी ओलीस आर्थिक गुन्हा शाखेने दिली आहे. जय ऍग्रोटेकच्या संचालक सुनेत्रा पवार यांनी 2010 रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे या प्रकरणाशी यांचा संबंध नाही व कोणतेही पुरावे सापडले नाही. असे मुंबई पोलीस आर्थिक गुन्हा शाखेने सांगितले आहे. यामुळे सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात अली आहे. 
 
2007 आणि 2011 मध्ये शिखर बँकेच्या कामाची तपासणी केली गेली होती. बँकेची चौकशी करण्यात आली कारण यामध्ये घोटाळा दिसत होता. तसेच कोटींचे नुकसान या बँकेचे झाले असे दिसले होते. व कमीतकमी 25 हजार कोटी रुपयांचं घोटाळा केला गेला आहे असे दिसले होते. पण पोलिसांनी तपास केल्यानंतर कोणतेही पुरावे मिळाले नाही. व पोलिसांनी कोर्टामध्ये बँकेचे कोणतेही नुकसान झाले नाही असे रिपोर्ट सादर केले होते. तसेच पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, बँकेने 1 हजार 343 कोटी  41 लाख वसूल केले आहेत. 
 
साखर कारखान्यांना शिखर बँकेने कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले होते परंतु बँकेनं नियमांचे पालन केले नाही. व नंतर हे सर्व कारखाने तोट्यामध्ये गेलेत. व कमी किमतींमध्ये बँकेच्या संचालकाच्या जवळच्या लोकांना विकल्याचे आरोप लावले होते. व यामुळे पवार कुटुंबीय हे मोठ्या अडचणींमध्ये सापडले होते. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली कारण अजित पवार यांच्यावर कारखान्यांबद्दल मनी लाँड्रींगचा आरोप लावून तपास सुरु करण्यात आला होता. 
 
एकूण 70 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शारद पवार गटाचे आमदार प्राजक्त तानपुरे आणि रोहित पवार तसेच सुनेत्रा पवार यांना शिखर बँक घोटाळा प्रकरणातून मुंबई पोलिसांकडून दिलास मिळाला आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती