सध्या राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढला असून पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच धुक्याचा जोर वाढण्याचे हवामान खात्यानी शक्यता वर्तवली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड या ठिकाणी सकाळी दाट धुक्यांची चादर पसरली होती.
येत्या तीन दिवस पंजाब, हरियाणा, चंदीगड, आणि दिल्लीतील काही भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुण्यात आणि त्याच्या नजीकच्या परिसरात तापमान घसरण्याची शक्यता असून सकाळी धुके पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवार नंतर ढगाळी वातावरण असून तापमानात किंचित वाढ होईल. सोमवार ते बुधवार किमान तापमान 12-13 अंशाच्या तर गुरुवारी त्यात वाढ होऊन 14 अशा पर्यंत राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.