मासेमारी बंदीच्या कालावधीत यांत्रिक नौकांव्दारे मासेमारी, नौका मालकांवर दंडात्मक कारवाई

गुरूवार, 28 जुलै 2022 (14:36 IST)
वेंगुर्ले - मासेमारी बंदीच्या कालावधीत मासेमारी केल्यामुळे एकावर कारवाई करण्यात आली आहे. मासेमारीस बंदी असतानाही छोट्या नौकेला आऊटबोर्ड इंजिन लावून गरकणी नामक मासेमारी केल्याने निवती येथील श्याम सारंग यांच्या नौकेवर कारवाई करण्यात आली.

वेंगुर्ले मत्स्यखात्याच्या पथकाने तब्बल 6 तास किनारी थांबून कारवाई केल्याचे समजते. सदर नौका मालकांवर दंडात्मक कारवाईसाठी मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे प्रकरण सादर करण्यात येणार आहे.
 
गुप्त माहिती मिळाल्याने वेंगुर्ले मत्स्य खात्याचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस आदी पथक हे निवती समुद्रकिनारी कारवाईसाठी थांबल्याचे पाहून श्याम सारंग यांनी आपली धनुर्धारीकर्ण नावाची पर्सनेट नौका मंगळवारी रात्री दाभोली किनाऱ्यावर लावली आणि मासळीची विल्हेवाट लावली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती