आधी परीक्षा मग थेट लग्नमंडपात नवरी

Webdunia
शनिवार, 15 एप्रिल 2023 (19:28 IST)
लग्न म्हटलं की नवरदेव आणि नववधूचे काही वेगळेच  स्वप्न असतात.टिटवाळा जवळच्या गोवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात सध्या पदवी परीक्षा सुरु आहे मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या सहाव्या सत्रातील परीक्षा देण्यासाठी नवरी आधी परीक्षा देण्यासाठी परीक्षा  केंद्रावर पोहोचली अश्विनी म्हसकर असे  या विद्यार्थिनीचे नाव आहे. अश्विनी ही अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असून लग्नाच्या दिवशी  तिचा  पेपर होता पण तिने परीक्षेला प्राधान्य देत परीक्षा केंद्रावर पोहोचून परीक्षा दिली. नंतर तिने थेट लग्नमंडप गाठले. तिच्या या कामाचे  सर्वत्र कौतुक होत आहे. अश्विनीचे महाविद्यालयातील प्राचार्य,शिक्षक कर्मचाऱ्यांनी कौतुक केले असून भावी  आयुष्यासाठी  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या .   
 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख