The Knee Clinic ने मुंबईत सुरू केले पहिले रोबोटिक नी रिप्लेसमेंट केंद्र
सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:00 IST)
केंद्राचे उद्दिष्ट- नवीन संशोधनावर आधारित आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध उपचार प्रदान करून नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करण्यासाठी नवीन युगाची सुरुवात करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे.
उद्घाटन समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, वेटलिफ्टिंगमध्ये भारताची पहिली ऑलिम्पिक पदक विजेती, सुश्री कर्णम मल्लेश्वरी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
२९ ऑगस्ट २०२१ : एसीआय-कुंबल्ला हिल हॉस्पिटल च्या नी क्लिनिकने आज मुंबईतील पहिल्या रोबोटिक नी रिप्लेसमेंट सेंटर ची घोषणा केली. गुडघ्याच्या उपचार प्रक्रियेसाठी NAVIO-CORI रोबोटिक्स प्लॅटफॉर्मची ही नवकल्पना या दशकातील अग्रगण्य आरोग्य सेवांपैकी एक आहे, नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेच्या आधुनिक युगाची ही सुरुवात आहे.
गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेचे हे भविष्य असल्याचा विश्वास, गुडघा शल्यचिकित्सक डॉ. मितेन शेठ, एमएस, डीएनबी (ऑर्थोपेडिक्स) यांनी केला. “गुडघ्याच्या शस्त्रक्रियांसाठी आम्ही रोबोटिक्सच्या सहाय्याने एक आधुनिक सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचा मला आनंद होतो आहे. मला खात्री आहे की
यामुळे रूग्ण कमी वेदना, जास्त रक्त वाया न जाता, तसेच अधिक दिवस हॉस्पिटलमध्ये न राहता लवकर बरे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पारंपारिक पद्धतीने केली जाणारी नी रिप्लेसमेंट ची शस्त्रक्रिया, सर्जनची अंमलबजावणी किंवा संगणकीय नियोजनावर अवलंबून असते. मात्र रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रक्रियेमध्ये नियोजन आणि अंमलबजावणी या दोन्ही गोष्टींसाठी रोबोटिक्स ची मदत घेता येऊ शकते.
दरम्यान, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “अशा उपक्रमाचा एक भाग आणि आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रगतीचा साक्षीदार होताना मला आनंद होत आहे. आपल्या गतिशील देशाच्या प्रगती आणि वाढीसाठी रोबोटिक्स नी रिप्लेसमेंट सारख्या तांत्रिक पद्धती अत्यावश्यक आहेत. मी
नी क्लिनिकच्या टीमला शुभेच्छा देते आणि आशा करते की आपण याद्वारे देशात जास्तीत जास्त लोकांची सेवा कराल. ”
क्रीडा क्षेत्रात वैद्यकीय तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगताना, वेटलिफ्टिंगमध्ये भारताची पहिली ऑलिम्पिक पदक विजेती कु. कर्णम मल्लेश्वरी यांनी सांगितले की, आज क्रीडाक्षेत्रात सकारात्मक बदल होताना दिसत आहे, कारण आजच्या खेळांडूंमध्ये आमच्या काळाच्या तुलनेत अधिक चांगले सामर्थ्य आणि संधी आहेत.
कर्णम मल्लेश्वरी फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष या नात्याने, मला असे वाटते की, अशा प्रकारच्या तांत्रिक क्रांतींना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. क्रीडा क्षेत्रात या तंत्रज्ञानामुळे चांगली मदत होऊ शकेल. खेळाडूंना अनेक वेळा दुखापतींच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. विशेषत: ग्रामीण आणि वंचित समाजासाठी तसेच तळागाळातील खेळाडूंसाठी अशा उपचारांमुळे प्रोत्साहन मिळेल, आणि पुन्हा एकदा उभं राहण्याचे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. आपण सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी (सीएसआर) कार्यक्रमांसह योग्य सहकार्याने सेवा पोहोचण्याचा हेतू ठेवू शकतो, खेळाडूंना दुखापतीपासून बचाव आणि उपचारांबद्दल शिकवू शकतो. तंत्रज्ञानासह भारतीय क्रीडा परिसंस्थेपर्यंत आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आपण एकत्र काम करू आणि सर्वोत्तम उपचार सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांना पार करू.