नाशिकच्या कुलंग किल्ल्यावर 13 जण अडकले !

सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (13:43 IST)
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुलंग किल्ल्यावर धक्कादायक प्रकार समोर येत आहे. येथे काल रात्री पासून 13 जण अडकल्याची घटना आहे. अडकलेल्यांमध्ये 3 मुले, 8 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
 
इगतपुरीच्या काही भागात पाऊस सुरु असून बचाव कार्यासाठी चांदोरी येथील रेस्क्यू टीम रवाना झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली डॅम जवळ असलेल्या कुलंग किल्ल्यावर फिरायला गेले होते. पर्यटक रात्री पासून अडकले आहे.
 
पहाटे ३ वाजेपासून जिल्हा आपत्ती व्यव्यवस्थापन , वनविभाग महसूल विभाग पोलिस प्रसासन घटनास्थळी दाखल झाले असून संबंधितांना फोनवरून घाबरून जाऊ नका, बॅटरी बॅकअप वाचवून संपर्कात राहणे बाबत धीर देण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती