अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा

सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (11:48 IST)
अमरावतीमध्ये गाडगेनगर पोलिस स्टेशन हद्दीतील विवाहीतेने अनैसर्गीक कृत्य केल्याचा आरोप करत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लग्न झाल्यानंतर वारंवार अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप या नवविवाहित पत्नीने केला आहे. तिच्या तक्रारीनुसार रेल्वे कर्मचारी असलेल्या पती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
पतीने लग्नानंतर वारंवार आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. नकार दिला असता पतीकडून मारहाण व शिवीगाळ झाल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे.  तू माझ्या कामाची नाही, असे म्हणत तुला ‘तलाक’ देतो असे तो तिला वेळोवेळी म्हणत होता. त्यानंतर तीनवेळा ‘तलाक’ असे म्हणून त्याने तिला तलाक दिला. बॉन्ड पेपरवर बळजबरी स्वाक्षरी देखील घेतली असल्याचे पिडीतेने म्हटले आहे.
 
याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात अनैसर्गिक कृत्य करणे, विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करणे यासह सहकलम 3 व 4 मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण अधिनियम 2019 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती