या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आळंदी म्हातोबा येथील काही पोल्ट्री धारक शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी एका कंपनीकडून कोंबड्यांसाठीचे खाद्य विकत घेतले होते. हे खाद्य खाल्ल्यानंतर कोंबड्यानी अंडे देणे बंद केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी एकत्र येत लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि संबंधित कंपनी विरोधात तक्रार दिली.
पोलिसांनीही या शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनादेखील या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संबंधित कंपनीने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.