बनावट आधार कार्ड, बनावट नाव वापरून, सचिन वाझेंचे पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य

गुरूवार, 25 मार्च 2021 (07:46 IST)
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी व “एंटीलिया” स्फोटकं प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दुसरीकडे यामुळे, या दोन्ही प्रकरणात मुख्य संशयित असलेले आणि सध्या एनआयए (NIA)च्या अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
 
दरम्यान, एनआयएच्या अधिक तपासात, सचिन वाझे यांचे बनावट आधार कार्ड नुकतंच समोर आलं आहे. याच आधारकार्डचा वापर करत वाझे हे “ट्रायडेंट” हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे वाझेंच्या या कार्डवर ‘सुशांत सदाशिव खामकर’ असे नाव देण्यात आले आहे. वाझे या खोट्या नावाने १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान हॉटेलमध्ये राहत होते. त्यामुळे बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलात राहण्याचे कारण काय?, मुंबईत घर असताना वाझे पाच दिवस तेथे का रहात होते?, त्यांना भेटायला तेथे कोण कोण आले होते?, याचा तपास सध्या एनआयए करत आहे.
 
मुंबईतील या पंचतारांकित हॅाटेलमध्ये सचिन वाझेसाठी, मुंबईतल्या एका ज्वेलरीच्या मालकाने हॅाटेलमध्ये १०० दिवसांसाठी रुम बुक केली होती. अशी माहिती देखील समोर येत आहे. हा ज्वेलरीचा मालक सचिन वाझेचा खास मित्र होता. तसेच, रुम बुक करण्यासाठी एका ट्रॅव्हल एजन्सीला ज्वेलर्स मालकाने 25 लाख रुपये दिल्याचेही तपासात समोर आले आहे. याच मालकाने वाझेचे बनावट आधार कार्ड बनवल्याचा एनआयएला संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
तसचं या पंचताराकिंत हॅाटेलमधून काही वस्तू एनआयएने ताब्यात घेतलेल्या असून, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएने जप्त केले आहेत. या सीसीटिव्हींची तपासणी एनआयएने केली असून, आहे. त्यातून एनआयएनला सचिन वाझेंच्या हातात पाच मोठमोठ्या बॅगा दिसत आहे. त्या बॅगेत पैसे आहेत की आणखी काय? ते वाझे यांच्या चौकशीतून समोर येणार आहे. तसेच यातील दुसऱ्या एका सीसीटिव्हीच्या तपासणीत एक महिला दिसत आहे. या महिलेच्या हातात नोटा मोजण्याची मशीन दिसत आहे. या महिलेचा सचिन वाझे यांच्याशी काही संबंध आहे का? ती महिला सचिन वाझेंना ओळखते का? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती