निवडणूक कशी जिंकायची हे फडणवीस यांनी शिकवलं - रामदास आठवले

Webdunia
रविवार, 12 जून 2022 (11:28 IST)
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध पक्षांच्या नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया येत आहे. भाजपची रणनीती आणि शिवसेनेचा पराभव का झाला यासंदर्भातही अनेक वक्तव्य केली आहेत.
 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखवली. निवडणूक कशी जिंकायची हे फडणवीस यांनी शिकवलं. बड्या बड्या वाघांना त्यांनी मान खाली घालायला लावली.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. त्या म्हणाल्या, "कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही सिनेमा फ्लॉप होतो. पण अमिताभ बच्चन हे अमिताभ बच्चन आहेत. आमचे नेते 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. अर्धी वर्षे ते विरोधात आणि अर्धी वर्षे ते सत्तेत होते. केंद्र सरकार दडपशाही करते. ही निवडणूक आहे. आपण काहीवेळा जिंकतो, काहीवेळा हारतो."

संबंधित माहिती

पुढील लेख