देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकल्यावर राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यांनी 125 तासाचा पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. या पेन ड्राइव्ह मध्ये विशेष सरकारी वकील ऍड प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्या संदर्भात आज त्यांनी नवा खुलासा केला आहे. या पेन ड्राइव्ह प्रकरणात काही पत्रकार आणि पोलीस कॉन्स्टेबल यांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
या पेन ड्राइव्ह मध्ये प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय विरोधकांचे कत्तल करण्याची कट कारस्थान करण्याचे ठिकाण असल्याचे म्हटले होते. तसेच सरकारी वकील खोटे साक्षीदार तयार करणे आणि एफ आय आर नोंद करतात . साक्षी कसे तयार करायचे आणि त्यातून पैसे मिळवायचे हे सर्व काम सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा कार्यालयात केले जातात.