खळबळजनक ! नदीत वाहत आली हाताची बोटं, पोलिसांचे शोध कार्य सुरु

मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (12:35 IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सुसेरी गावात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. गावातून एक नदी वाहते नारंगी नदी. या नदीपात्राच्या किनाऱ्यावरून माणसाच्या हाताची बोटे आणि मांसाचे तुकडे आढळले या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रकरणाची नोंद केली असून तपास करीत आहे. 
 
खेड तालुक्यातील सुसेरी नंबर 2 गावात बाळकृष्ण भागोजी करबटे(65)हे मुंबईवरून एका नातेवाईकांच्या कार्यासाठी आले होते.ते रविवारी रात्री पासून बेपत्ता होते. नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी निघाले असता गावकऱ्यांना शमशानभूमीजवळच्या नदीपात्रात माणसाच्या हाताची कापलेली बोटें आणि मांसाचे तुकडे सापडले. या बाबत पोलिसांना कळवण्यात आले असता पोलिसांनी नदीपात्रात मृतदेह शोधायला सुरु केला आहे. हे बोटं आणि मांसाचे तुकडे कोणाचे आहे पोलीस याचा शोध घेत आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती