बालविवाहने एका निष्पाप जीवाचा बळी घेतला,कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल

मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (12:17 IST)
प्रत्येक गोष्टींसाठी काही सीमा आणि कायदे आहे. त्या कायद्याचं पालन करने बंधनकारक आहे. आपल्या देशात लग्नासाठी देखील काही कायदे सांगितले आहे. आणि लग्नासाठी वयोमर्यादा देखील बांधण्यात आली आहे. आज देखील भारताच्या अनेक भागात कमी वयात मुलींचे लग्न केले जातात. कमी वयात केलेल्या लग्नाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. अशी दुर्देवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे घडली आहे. या घटनेत निष्पाप मुलीला आपले प्राण गमवावे लागले. तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या आई वडिलांनी उस्मानाबाद येथील कायापुर रहिवाशी अजित बोंदर वय वर्ष 28 याच्याशी लावून दिले. त्या वेळी मुलीचे वय 15 वर्षाचे होते. लग्नाच्या वर्षभरात मुलगी गरोदर झाली आणि अवकाळी येणाऱ्या मातृत्वाचा भार तिला सहन झाला नाही आणि  वयाच्या 16 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी मुलीच्या आई वडील आणि इतर सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये मुलीची आई चंद्रकला बाई घुगे, मुलीचे काका लक्ष्मण घुगे, राम घुगे, पती अजित बोंदर, सासू जनाबाई बोंदर ,सासरे धनराज बोंदर यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे. 
 
मुलीला बाळंतपणाचा भार सहन झाला नाही त्यामुळे ती अशक्त झाली होती तिला 7 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल केले होते. 13 ऑक्टोबर ला तिची प्रकृती खालावली तिची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. दरम्यान तिची कोरोनाचाचणी केली असता तिचा अहवाल सकारात्मक आला होता. कमी वयात लग्न केले आणि गरोदरपणाचा भार तिच्यावर आल्यामुळे ती ते सहन करू शकली नाही आणि तिला आपले प्राण गमवावे लागले. समाजाच्या दबावाखाली येऊन आई वडिलांनी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले.त्यांनी केलेल्या या चुकीमुळे एक निष्पाप जीव बाळ विवाह ला बळी गेला.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती