एकनाथ शिंदे यांचाही युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव होता

गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:11 IST)
भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसपक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला.
 
२०१९ मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवून बहुमत मिळालेले असतानाही शिवसेनेने शेवटी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला पण भाजपासोबत आता राहायचे नाही ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. आपण, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती असे चव्हाण यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती