अखेर पालकमंन्त्र्याची यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री
रविवार, 25 सप्टेंबर 2022 (12:26 IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. गेले अनेक दिवस पालकमंत्र्यांची नेमणूक कधी होणार हा प्रश्न विचारला जात होता. अखेर आज पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलंय. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
शिंदे गटातील मंत्र्यांकडे कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद :
राज्यात महत्त्वाचं मानलं जाणारं गृहमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद ही दोन खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे ठेवलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडची खाती :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडची खाती :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:
भाजपचे मंत्री :
1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
2) सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
3) चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
4) डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
6) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
7) सुरेश खाडे- कामगार
8) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
9) अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शिंदे गटाचे मंत्री :
1) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
2) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
3) संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
4) संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
5) उदय सामंत- उद्योग
6) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण