सपकाळ नॉलेज हब संस्थेच्या हबमधील 4500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य वाचणार

बुधवार, 10 जुलै 2019 (16:32 IST)
सपकाळ नॉलेज हब संस्थेच्या  हबमधील 4500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य वाचणार असे चित्र निर्माण झाले आहे. आर्थिक अडचणी मुळे या संस्थेत शिकत असलेल्या राज्यातील हाजारो विद्यार्थ्यांनचे भवितव्य अंधारत होते. वर्ष वाया जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.
 
सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. याबाबत आज मुंबई येथे संचालक अभय वाघ यांच्याकडे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीस सहसंचालक नाठे, संस्थाचालक रवींद्र सपकाळ, संचालक बी.बी.रायते, प्रा.बागल, प्रा.फरतरे, प्रा.गोंदकर, भाजपाचे सुनील देसाई, सुनील थोरात यावेळी बैठकीत उपस्थित होते. त्र्यंबकरोडवर असलेले सपकाळ नॉलेज हब संस्थेच्या हबमधील 4500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले होते. तसेच वर्षभरापासून पगार न झाल्याने हबमधील 250 प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावर तोडगा काढाण्यासाठी आमदार प्रा.देवयानी यांनी संचालक अभय वाघ यांच्या कडे विस्तृत बैठक घेऊन असलेले सर्व प्रश्न सोडविले. संचालक अभय वाघ हे संस्थेकडे पुढील काळात व्यक्तीशा लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन यांनी संस्थेच्या सर्व कर्माच्याचे पगार, पीएफ तसेच विध्यार्थीचे नियमित होतील असे अश्वासित केले. यावेळी विद्यार्थी ऋषिकेश रणसिंग, चिन्मय जोशी, फड विध्यार्थीही उपस्थित होते.
 
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये हीच कळकळ होती. म्हणून संचालक अभय वाघ यांच्याकडे तातडीने बैठक घेतली. नाशिकच्या संस्था मोठ्या व्हाव्यात. विध्यार्थीना दर्जेदार शिक्षण मिळावे हीच प्रामाणिक इच्छा आहे. आजच्या बैठकीतमुळे विध्यार्थी आणि प्राध्यापक यांचे सर्व विषय मार्गी लागतील. संस्थचे असलेले सर्व विषय लवकरच सुटतील.संस्थेला पुढे काही अडचणी आल्यास मी त्यांना प्रामाणिक मदत करेल - आ. देवयानी फरांदे, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ
 
मी नाशिकचा असल्याने सदर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सोडवणूक करेल. विद्यार्थ्यांची कुठलीही तक्रार या पुढे यायला नको संस्थेने याची काळजी घ्यावी.आमदार देवयानी फरांदे यांच्या मध्यस्थीमुळे सदर प्रश्न सुटला -- अभय वाघ ,संचालक तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र
 
आज संचालक उदय वाघ यांच्याकडे बैठक झाली संस्थेमध्ये असलेले प्रश्न लवकर सोडले जातील. विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यावे व नियमित तासिकेला  उपस्थित राहावे रवींद्र सपकाळ 
 
संचालक, सपकाळ नॉलेज हब

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती