आज महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता इयत्ता 10 वी चा निकाल कधी लागणार या बद्दल विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. त्यांच्या मनातील प्रश्नांचे उत्तर शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिले आहे. त्यांनी इयत्ता 10 वी च्या निकालाची तारीख जाहीर केली असून येत्या 27 मे रोजी निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
ते म्हणाले कोणीही नाराज होऊ नयेत संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा येत्या 27 मे रोजी 10 वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. आरटीई घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले याला घोटाळा म्हणता येणार नाही, कोणीही कागदपत्रे खोटी तयार करू नये. जिल्हास्तरावर ऍडमिशनची प्रक्रिया होते. या बाबत जिल्हास्तरावर गुन्हा नोंदवला आहे.