गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांची एकूण 5.73 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये लोणावळ्यातील एक बंगला, जळगावमधील तीन जमिनीचे प्लॉट आणि तीन फ्लॅट जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे.