नारायण राणे आज रत्नागिरीत दाखल होणार,राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज

शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (10:44 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून सुरु होणार.त्यांच्या अटकेमुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली होती.न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर कोकणात आज पासून तीन दिवसीय जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहे.त्यांचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग आणि कणकवलीत राणे समर्थकांनी कंबर कसली असून शहरात बॅनर्स लावण्यात आले आहे. 
 
भाजप आमदार नितेश राणे यांच्या सोशल मीडियावरून राणे यांच्या तीनदिवसीय कोकण जन आशीर्वाद यात्रेचा उल्लेख केला आहे.राणे आज रत्नागिरी जिल्ह्यत तर पुढील दोन दिवस सिधुदुर्गात असणार.नितेश यांच्या सोशल मीडियावरून एक फ्लेक्स देखील शेयर करण्यात आला आहे. या फ्लेक्स मध्ये योद्धा पुन्हा मैदानात असं लिहिले आहे.
 
राणे यांच्या या जन आशीर्वाद यात्रेच्या दौऱ्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षातील नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 
 
राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी कणकवली शहराला सजवून ठिकठिकाणी गुढ्या उभारण्यात आल्या आहे.कोकण हा राणे यांचा बालेकिल्ला असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्या आणि राणे समर्थक सज्ज झाले असून कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती