स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाउंडेशतर्फे महिलांना समर्पित 'इच फॉर इक्वल ऑल - वूमन काँनक्लेव्ह' ला भरघोस प्रतिसाद

मुक्ति फाऊंडेशनने सामाजिक कार्यकर्त्या स्मिता ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सबलीकरणासाठी आयोजित संमेलनाचा नुकताच समारोप झाला. स्मिता ठाकरे यांच्या संमेलनाचे संचालन करण्याव्यतिरिक्त, या कार्यक्रमात सर्व स्तरातील इतर बहुभाषिक महिलांचा सहभाग दिसून आला. 
 
राजकारणी प्रिया दत्त, ज्वलंत उच्च पोलीस अधिकारी माया मोरे, अकॅडमी अ‍ॅवॉर्ड विजेत्या आणि बाफ्टा नामांकित चित्रपट निर्मात्या गुनित मोंगा, वनलाईन वेलनेस यामागील गतिशील शक्ती तसेच भारतातील ग्लोबल वेलनेस अँबेसेडर रेखा चौधरी, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रशंसित लेखक-दिग्दर्शक मीना नाईक आणि एक प्रख्यात पत्रकार-फिल्ममेकर, सामाजिक कार्यकर्ता-सुधारक आणि टेडएक्स वक्ता अनुशा श्रीनिवासन अय्यर ह्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. 
 
ह्या प्रसंगी स्मिता ठाकरे त्यांचा उत्साह व्यक्त करत म्हणाल्या, “हया महिला दिन आठवडा निमित्त, मी हे सर्व महिला संमेलन (ऑल - वूमन काँनक्लेव्ह) संयोजित आणि सादर केल्याचा मला अभिमान आहे. मुक्ती फाऊंडेशन सर्व स्त्रीत्वाचे समर्थन करते, सलाम करते आणि त्यासाठी परिपूर्ण सशक्तीकरण मिळविण्याचा प्रयत्न करते. चला एकमेकांना मदत करूया आणि स्त्रिया सर्व काही करु शकतात हे जगाला सिद्ध करुया! ”
 
ह्या कार्यक्रमाचे आयोजन अंधेरी येथे स्थित मुक्ती कल्चरल हबमध्ये करण्यात आले होते. एक अत्याधुनिक सुसज्ज प्रेक्षागृह, विविध प्रकारच्या कलात्मक आणि बौद्धिक प्रयत्नांसाठी मध्यबिंदू बनलेले आहे आणि इतरांना आकर्षित करत आहे. विद्यार्थी, उद्योजक आणि सर्व स्तरातील महिलांचा समावेशामुळे या संमेलनाला एक मोठे यश मिळाले!
 
या अधिवेशनाच्या बरोबरच, मुक्ती फाउंडेशनने ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग, मानसिक स्वास्थ्य जागरूकता, पथनाट्य, रिबन वितरण आणि चर्चगेट ते बोरिवली पर्यंत पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील शौचालये निर्जंतुक करणे तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी करिअर उपक्रम देखील राबवले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती