मुंबईत चालकाला मिरगीचा त्रास झाला,अनियंत्रित टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू तीन जखमी

शनिवार, 28 डिसेंबर 2024 (15:37 IST)
मुंबईतील घाटकोपर परिसरात शुक्रवारीअनियंत्रित टेम्पो गर्दीतून धडक देत निघाला आणि या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर तिघे गंभीर जखमी झाले.पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. 

 सदर घटना घाटकोपरच्या चिराग नगरची आहे. घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजला तपासून प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.प्राथमिक तपासणीत चालकाला एपिलेप्सी म्हणजे मिरगीचा त्रास झाला आणि त्याचा टेम्पोरील ताबा सुटून तो गर्दीत शिरला आणि त्याने काही जणांना जोरदार धडक दिली त्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वैद्यकीय रेकॉर्ड तपासले जात आहेत.या प्रकरणी टेम्पोचालकाच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून टेम्पो ताब्यात घेतला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती