तन्वी घाणेकरच्या मृतदेहाची होणार डीएनए चाचणी

मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (14:54 IST)
रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आढळलेल्या तन्वी घाणेकर हिच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आह़े तन्वी बेपत्ता झाल्यापासून 6 दिवसानंतर खोल दरीत तिचा मृतदेह आढळला होत़ा यावेळी मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने कपडय़ांच्या आधारे ओळख पटविण्यात आली. मात्र तो मृतदेह तन्वीचाच असल्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े
 
तन्वीच्या आत्महत्येबाबत पोलिसांकडून आता कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येत आहेत़ 3 ऑक्टोबर रोजी तन्वीचा मृतदेह आढळून आला तेव्हा घटनास्थळी तिचे नातेवाईक उपस्थित होत़े तो मृतदेह तन्वीचाच असल्याचे नातेवाईकांनी खात्रीपूर्वक सांगितले होत़े मात्र मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.  परंतु भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात येऊ नये यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आह़े
शहरातील खालचा फगरवठार येथील  तन्वी रितेश घाणेकर (33) 29 सप्टेंबर पासून बेपत्ता होत़ी यासंदर्भात तिचा पती रितेशने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दिली होत़ी 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती