या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, स्वत: वर गोळी झाडून बियाणी यांनी आत्महत्या का केली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. याचा सध्या तपास सुरू आहे.