पुढील २५ वर्ष तरी महामंडळ सातवा वेतन लागू करू शकत नाही

मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (12:05 IST)

पूर्ण राज्यात एस टी महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने संप सुरु केला आहे. यावर सरकारने सकारत्मक पाऊल न उचलता कडक धोरण घेतले आहे. यामध्ये कर्मचारी वर्गाच्या मागणीवर बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते  म्हणतात की आज काय पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही कोठून पैसा उभा करायचा असे बोलत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. यावर त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली असून  एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर  आहे असे म्हटले आहे. मात्र दुसरीकडे  राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि इतर वर्गाचं चांगले पगार देवून त्यांचे कौतुक करते मात्र दिवस रात्र कमी पगारात  प्रवाशांच्या सेवेसाठी झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत मंत्र्यांनी असंवेदनशील विधान का केले असावे  असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावर बोलताना इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड म्हणतात की मंत्री महोदय दिवाकर रावतेंचं यांचे विधान चुकीचे आहे यामध्ये नागरिकाचे जे हाल होत आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी दिवाकर रावते आणि राज्य सरकारची आहे. आम्ही हौसेने संप केलेला नाही, वाटाघाटीसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, अस त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती