एस टीचा संप सुरु झाला, अडकले हजारो प्रवासी

मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (11:55 IST)

राज्यात एस टी महामंडळाचा संप सुरु झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद पडली आहे. यामुळे हजारो प्रवासी  दिवाळीत अडकले आहे.यामध्ये कर्मचारी वर्गाला सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आणि इतर प्रलंबित  मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. यामध्ये  17 एसटी कर्मचारी ऑक्टोबर मध्यरात्रीपासून  संपावर गेले आहेत.  मध्यरात्रीपासूनच प्रवासी अडकले आहेत. यामुळे खासगी सेवा पुरवणारे माजले असून त्यांनी प्रवासी दर वाढवले आहेत.या आंदोलन संपात  एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे दिवाळी सणाला सुरुवात झाली असून  ऐन सणाच्या तोंडावर या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपात कामगार सेना सहभागी होणार नाही. कामगार सेनेचे कर्मचारी कामावर जातील असे चित्र आहे. कारण सत्तेत शिवसेना असल्याने कामगार सेंना संपात सहभागी झाली नाही. जे प्राध्यापक काही काम करत नाही त्यांना सातवा आयोग आणि कमी खर्चात काम करत असलेल्या एस टी कर्मचारी वर्गाला मात्र कोणी विचारात नाही अशी प्रतीक्रिया कर्मचारी दत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती