तलवार दाम्पत्याचा ४९,५०० रूपये मानधन घेण्यास नकार

सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (16:58 IST)

आरूषी-हेमराज हत्याकांडप्रकरणी  डॉ. राजेश व नुपूर तलवार यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वर्ष २०१३ पासून डासना तुरूंगात ते शिक्षा भोगत आहेत. शिक्षेदरम्यान या दाम्पत्यांनी तुरूंगातील कैद्यांवर उपचार केले. या उपचारापोटी त्यांना मिळालेले ४९,५०० रूपये मानधन घेण्यास दोघांनी नकार दिला असल्याची माहिती तुरूंगाधिकाऱ्याने दिली आहे. 

तुरूंगाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तलवार दाम्पत्यांनी रूग्णांची सेवा केल्यामुळे त्यांना मिळणारे मानधन घेण्यास नकार दिला आहे. या दोघांनी ४९,५०० रूपये कमावल्याचे तुरूंग अधीक्षक डी. मौर्य यांनी या सांगितले. या दाम्पत्याने तुरूंगातून सुटल्यानंतरही दर १५ दिवसांनी तुरूंगात येऊन कैद्यांवर उपचार करू, असे आश्वासन या दाम्पत्यांनी दिल्याचे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती