जपानचे टोकियो सुरक्षित शहरांच्या यादीत पहिले

शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (15:11 IST)

जगातील सगळ्यात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये टोकयोनं पहिला क्रमांक पटकावला आहे. द इकोनॉमिस्टनं २०१७ सालच्या सगळ्यात सुरक्षित शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये मुंबई ४५ व्या क्रमांकावर आहे तर दिल्ली ४३ व्या क्रमांकावर आहे. यामध्ये डिजीटल, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि वैयक्तिक सुरक्षितता यांचा आधार घेऊन हा सर्व्हे करण्यात आला आहे. 

या सर्व्हेच्या शेवटच्या १० शहरांमध्ये ढाका, कराची, मनिला, हो ची मिन्ह आणि जकार्ता या आशियातल्या शहरांचा समावेश आहे तर कैरो आणि तेहरान ही मध्य पूर्व आणि आफ्रिकेतली शहरं आहेत. सगळ्यात सुरक्षित टॉप १० शहरांमध्ये अमेरिकेतल्या एकही शहराचा समावेश नाही. सॅन फ्रान्सिसको हे एकमेव शहर टॉप २० मध्ये आहे. टॉप १० शहरांमध्ये मॅड्रीड, बार्सीलोना, स्टॉकहोल्म, ऍम्सटरडॅम, झुरीक, सिंगापूर, वेलिंग्टन, हाँगकाँग, मेलबर्न आणि सिडनीचा समावेश आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती