नवीन पनवेलमध्ये सुमारे ३५०० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत

मुंबई, नवी मुंबई, कल्याण आदी ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला.  मात्र पावसाच्या या दमदार हजेरीमुळे मुंबईचे रस्ते जलमय झाले. तर लोकल वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या तर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडाची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. नवीन पनवेलमध्ये विद्युत वाहिनीवर झाड काेसळल्याने सुमारे ३५०० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.  
 
शुक्रवार सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक उपनगरात पाणी दुंबल्याने नाल्याचे रूप आले आहे. नवीन पनवेल सेक्टर १ अंबिका मंदिराजवळ दुपारच्यासुमारास 11kv  विद्युत वाहिनीवरच झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळे या भागातील सुमारे ३५०० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती