एकनाथ शिंदेंच्या बंडावरुनच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकेमध्ये मतभेद

शुक्रवार, 24 जून 2022 (08:28 IST)
यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांसाठी सर्व सुविधा पुरवण्यामागे भाजपाचा हात असल्याचं म्हटलं . विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या बंडामागे भाजपाचा हात असल्याचं वाटत नसल्याचं काही वेळापूर्वी म्हणाल्यानंतर लगेच शरद पवारांनी हा मुद्दा खोडून काढला. यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडावरुनच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकेमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलं.
 
अजित पवार काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांना मागील दोन दिवसांमध्ये ४६ आमदारांनी समर्थन दर्शवलं आहे. शिंदे हे मंगळवारी काही बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेले. त्यानंतर बुधवारी पहाटे ते बंडखोर आमदारांसोबत गुवहाटीमध्ये दाखल झाले. सध्या हे सर्व आमदार गुवहाटीमध्येच असून ठाकरे सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळपासून मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठकी पार पडल्यानंतर सायंकाळी शरद पवारांनी यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्राकारांशी बोलताना अजित पवारांना या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “अजून तरी तसं काही दिसलं नाही,” असं म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती