काँग्रेसचे नेते अमाजी मंत्री असलेले नारायण राणे भाजप प्रवेशाच्या चर्चाला आता अहमदाबाद कनेक्शन जोडलं गेलं आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नारायण राणे यांची भेट झाली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केल आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मात्र नेहमी प्रमाणे देवेद्र फडणवीस यांनी संयमी खेळी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री अमित शहांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये एक तास राणेंबद्दलच चर्चा झाली आहे. . नारायण राणेंही अहमदाबादमध्ये होते. नारायण राणे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिती एका खासगी वृत्तवहिनीला दिले आहे . मात्र दुसरीकडे नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचं टाळलंआहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात अंदाज लावणे जरां कठीण होतआहे.