केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी ची परीक्षा येत्या 15 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. ही परीक्षा 2 एप्रिल पर्यंत चालणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्याच दिवशी सीबीएसई बोर्डाचा संस्कृतचा पेपर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या दिवशी महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. मनसे ने सीबीएसईने पेपर ठेवण्यापूर्वी राज्यशिक्षण विभागाशी समन्वय साधणे गरजेचे होते.
सीबीएसई बोर्डाने या दिवशी परीक्षा ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. असा आरोप मनसे विद्यार्थी सेनाने केला आहे. अशी मागणी मनविसे चे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. या दिवशी सर्व शाळांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी केली पाहिजे .या दिवशी पेपर रद्द न केल्यास पेपर होऊ देणार नाही अशा इशारा दिला आहे.