मनोज जरांगे यांची महाराष्ट्र बंदची हाक

सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (11:44 IST)
मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे या साठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मंजूर करून सगे सोयरेंबाबत अध्यादेश काढला आणि त्याची प्रत  जरांगे यांना दिली.

सगे सोयरेची व्याख्या स्पष्ट करून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते पुन्हा 10 तारखे पासून आमरण उपोषणावर बसले आहे. या आंदोलक पाठिंबा मिळावा या साठी मराठा समाजाने सरकारच्या निषेधार्थ म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

मनोज जरांगे  हे शनिवार 10 तारखे पासून आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांना फेलोशिप पासून वंचित असणाऱ्या 50 विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील आणि सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. 

 Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती