मनोज जरांगेची गुणरत्न सदावर्ते आणि छगन भुजबळांवर टीका

रविवार, 28 जानेवारी 2024 (13:55 IST)
मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी केलेल्या लढाला यश मिळालं आहे. आंतरवाली पासून सुरु झालेल्या या आंदोलनालाच्या मागण्या अखेर सरकारने मान्य केल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला. भुजबळांच्या टीकाला मनोज जरांगे आंतरवालीत पोहोचल्यावर सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे काय म्हणतात हे ऐकण्याची मुळीच गरज नाही. घटना तज्ज्ञ या संदर्भात काय म्हणतात हे ऐकणे महत्त्वाचं आहे. मराठा समाजासाठी हा निर्णय महत्त्वाचा आणि हिताचा आहे. अध्यादेशच्या आदेशाचे कायद्यात रूपांतरण झालं असे मनोज जरांगे म्हणाले.  
 
मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी येथून उपोषण करून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला असून नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यासह सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आंदोलन केले होते. सरकारने मागण्या मान्य केल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.

Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती