मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ पोलिसांनी मुलाखत घेणाऱ्या आणि फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट वापरणाऱ्याविरुद्ध फडणविस यांच्याबद्दल युट्युब चॅनलवर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार मंगळवारी संध्याकाळी अक्षय जेव्हा फेसबुक पाहत होता, तेव्हा त्याला एक व्हिडिओ दिसला ज्यामध्ये एक मुलाखतकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हत्येबाबत वक्तव्य करत होता. याशिवाय दोन जातींमधील वादावरही ते बोलत होते. व्हिडिओमध्ये भाजप नेते फडणवीस यांच्याबद्दलही आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या गेल्या आहेत.
हा व्हिडिओ यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल झाला आहे. योगेश सावंत ७७९६ नावाच्या युजरने फेसबुकवर अपलोड केल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओही ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. सांताक्रूझ पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.