तुळजाभवानीच्या दर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लातूर- नांदेड मार्गावर रविवारी पहाटे घडली.कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडकून अपघात झाला.ही धडक एवढी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात चौघे मित्र जागीच ठार झाले. शिवराज लँकाढाई , मोनू कोतवाल, नार्मन कात्रे, व कृष्ण मंडके अशी मयतांची नावे आहेत.