सदावर्तेंचं वादग्रस्त विधान! म्हणाले, 'पवारांचे विचार नथुरामच्या पायाची.....

शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (21:33 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक वादग्रस्त वकतव्य करत टीका केली आहे. त्याचबरोबर सदावर्तेंनी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या नथुराम गोडसेचं समर्थनही केलं आहे. यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नथूराम गोडसेचा उल्लेख करत गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
 
गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
"शरद पवारांचे विचार हे नथूराम गोडसेच्या पायाच्या धुळी इतकेही नाहीत. गांधीजींचे विचार आता शिल्लक राहिलेले नाहीत", असं वादग्रस्त वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे.
 
"नथुरामजींची अखंड भारताची भूमिका प्रत्येक हिंदुस्तानी काळजामध्ये ठेवून आहे. कुणाला सुद्धा भारताचे तुकडे पसंत नाहीत. आज सुद्धा तोच विचार आहे. गांधींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही असं मला वाटतं. अखंड भारताचाच विचार शिल्लक आहे."
 
"पाकिस्तान देण्याचा विचार शिल्लक नाही. म्हणून त्यांचा विचार काँग्रेसी कधीही संपवू शकत नाहीत. असे थातूर मातूर फुटक्या विचारांचे तर कधीच संपवू शकत नाहीत. त्यांची लायकीच नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजींच्या पायाच्या धुळीइतका सुद्धा नाही असं माझं स्पष्ट मत आहे," असं सदावर्ते यवतमाळमध्ये बोलताना म्हणाले आहेत.
 
तर पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, नथुराम गोडसेच्या विचारातील अखंड भारताचा विचार आजही भारतीयांच्या मनात असल्याचं ते म्हणालेत. आज महात्मा गांधींचे विचार म्हणून जे सांगितले जातात ते विचार आता शिल्लक राहिलेले नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे असंही सदावर्ते म्हणाले आहे. तर काँग्रेस कधीच नथुरामच्या विचारांना संपवू शकत नाही असंही पुढे सदावर्ते म्हणाले आहेत.0//*//?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती