शरद पवार गटाची नागालँड, झारखंडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची केली मागणी

मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (08:51 IST)
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) गटाने नागालँडमधील पक्षाच्या सात आमदार आणि झारखंडमधील एका आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. हे आठ आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाबरोबर गेल्याने शरद पवार गटाने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्रातील 45 आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादीचे नेते धीरज शर्मा म्हणाले, “नागालँड आणि झारखंडमध्ये आमदारांविरुद्ध किंवा त्या राज्यातील ज्या विधानसभा सदस्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत किंवा त्यामध्ये सहभाग दाखवला आहे त्या आमदारांना अपात्र ठरवण्यात याव्यात अशी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.” असेही त्यांनी सांगितले.
 
राष्ट्रवादीचा अजित पवारांना पाठींबा देणारा बंडखोर गट हा नागालँडमधील भाजप सरकारमध्ये या अगोदरच सहभागी झाले आहेत. नागालँडमधील राष्ट्रवादीचे सातही आमदार मुंबईत असून मंगळवारी अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटानेही शरद पवार गटाच्या 10 आमदारांविरुद्ध अपात्रतेच्या याचिकाही दाखल केल्या आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती