संजय राऊत यांना ईडीकडून दिलासा, ईडीसमोर हजर होण्यास 14 दिवसाची मुदतवाढ

मंगळवार, 28 जून 2022 (15:51 IST)
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून दिलासा मिळाला आहे. ईडीसमोर हजर होण्यास 14 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. दरम्यान, पक्षाचे कार्यक्रम माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीसाठी जाणार नाही, ईडीला वाटत असेल तर मला त्यांनी अटक करावी, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे ईडीकडून पुढील काय कारवाई होणार याची उत्सुकता होती.
राऊत यांचे वकील आज ईडीसमोर हजर झालेत. ईडीने मागितलेली सारी कागदपत्र सादर करण्यास राऊत यांनी मुदतवाढ मागितली होती. त्यांची ही विनंती ईडीकडून मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार14 दिवसांनी कागदपत्रांसह हजर होण्याची विनंती ईडीनं स्वीकारली आहे, अशी माहिती संजय राऊत यांचे वकील विकास यांनी दिली.
संजय राऊत नियोजित दौऱ्यामुळे आज ईडीसमोर चौकशीला हजर राहू शकलेले नाहीत. त्यांच्यावतीने वकील उपस्थित राहत विनंती अर्ज सादर केला. आता 14 दिवसांनी कागदपत्रांसह हजर होण्याची विनंती ईडीनं स्वीकारली आहे. संजय राऊत नियोजित दौऱ्यामुळे आज ईडीसमोर हजर हजर राहू शकलेले नाहीत. त्यांच्यावतीने वकिलाने उपस्थित राहत अर्ज सादर केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती