काँग्रेस नागपूरमधील दंगलग्रस्त भागांना भेट देणार, हर्षवर्धन सपकाळ यांनी समिती स्थापन केली

शुक्रवार, 21 मार्च 2025 (12:45 IST)
17मार्चच्या रात्री झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील संबंधित पोलिस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शांततापूर्ण तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे. दंगलग्रस्त परिसरांची पाहणी करण्यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केली आहे.
ALSO READ: गोहत्या केल्यास 'मकोका' लागू केला जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समितीला बाधित भागांना भेट देऊन नागरिकांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत.स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यास त्यांनी सांगितले. नागपुरात झालेला हिंसाचार अत्यंत दुर्देवी घटना आहे. काही शक्ती नागपुरातील शांतता भंग  करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात शांतता राखणे महत्त्वाचे आहे. 
ALSO READ: नागपूर हिंसाचारात सायबर सेलने फेसबुकवर धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली
या साठी काँग्रेस  समितीचे स्थापन करण्यात आले आहे. या काँग्रेस समितीमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, यशोमती ठाकूर, माजी मंत्री नितीन राऊत, साजिद पठाण हे सदस्य आहे. तर शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना निमंत्रक आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रफुल्ल गुढे पाटील यांना समिती समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 
ALSO READ: नागपुरात नंदनवन, कपिल नगर येथील संचारबंदी उठवली
ही समिती बाधित भागातील पाहणी करून नागरिकांशी चर्चा करेल. त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत त्यांची समस्या जाणून घेणार आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती