काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीसोबत – बाळासाहेब थोरात

बुधवार, 22 जून 2022 (15:15 IST)
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी अल्पमतात आली आहे. शिंदे यांनी आपल्याबरोबर ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. तर खासदार संजय राऊत  यांनी देखील राज्य सरकार विधानसभा बरखास्तीच्या दिशेने प्रवास सुरू असल्याचे ट्विट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यातच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशी माहिती समोर येत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर तिन्ही आपल्या आमदारांसोबत बैठका घेत आहेत. काँग्रेसची नुकतीच बैठक झाली. यांनतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात  यांनी काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत असल्याचं म्हणाले आहेत.
 
बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी थोरात म्हणाले की, विधीमंडळ काँग्रेस अधिवेशनाची बैठक आता सुरू आहे. आम्हाला मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकिला पोहोचत आहोत. आमच्या काँग्रेस पक्षाचे ४४ आमदार आणि सदस्य हे मुंबईत रवाना होणार आहेत, तसेच आमचे सर्व आमदार हे महाविकास आघाडीसोबतच असणार आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती