आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यावं: मुख्यमंत्री

सोमवार, 18 मे 2020 (22:13 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधताना मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्मभर करायचा असेल तर ग्रीन झोन मधल्या लोकांनी पुढे यावं असं आवाहन केलं आहे.
 
लॉकडाउननंतर राज्यात जे नवे उद्योग येऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखून ठेवत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
 
येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योगांना संमती दिली आहे. ५ लाख मजूर यामध्ये काम करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. 
 
ठाकरे यांनी म्हटले की परदेशातून राज्यात येणारे उद्योजक किंवा देशातीलच काही उद्योजक नवे उद्योग स्थापन करण्यासाठी पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. प्रदूषण होणार नाही अर्थात ग्रीन उद्योग सुरु करणार असतील त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती