राज्यात काल नव्या २३४७ रुग्णांची भर; आतापर्यंत ७,६८८ जणांना डिस्चार्ज

सोमवार, 18 मे 2020 (07:03 IST)
राज्यात काल २ हजार ३४७ नवे रुग्ण आढळले असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच काल ६०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ७६८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानुसार राज्यांची एकूण संख्या ३३ हजार ५३ इतकी झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. हीच चिंताजनक स्थिती पाहता आज राज्यासह देशाचाही लॉकडाउन ३१ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे ३१ मे पर्यंत राज्याची ही स्थिती नियंत्रणात आणण्याची मोठी जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर असणार आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती