तसंच, ‘पक्षाने मला भरपूर दिले आहे हे नाकारून चालणार नाही. पक्षाने भरपूर दिले आहे मात्र पक्षासाठी आम्हीही खूप खस्ता खाल्या आहेत. आमचं आयुष्य समर्पित केलं आहे याचा ही विचार करायला हवा. पक्षाचे ऋण कधीही विसरणार नाही. मात्र, आम्ही पक्षात आयात केले नेते नाही.
गोपीचंद पडवळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपसाठी काय केलं आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांचं काय योगदान आहे, अशी अनेक नावं सांगत येतील.पक्षासाठी खस्ता खाणारे राहिले बाजूला आणि आयत्या वेळी आलेल्या लोकांना तिकीट दिले’ अशी नाराजी पुन्हा एकदा खडसेंनी बोलून दाखवली. आयात नेत्यांमुळे आम्हाला डावललं गेलं म्हणून आम्ही पक्षाच्या पुढेही भूमिका मांडली आहे. पुढची भूमिका अजून ठरलेली नाही. कोरोना संकट दूर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे काय करायचं आहे ठरवू, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.