मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवर (Sainik School Satara) उतरवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. मुख्यमंत्री तेथून पुढे रस्ते मार्गाने दरे गावाकडे रवाना झाले. हवामान खराब असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर त्यांचा मूळ दरे गावात उतरू शकले नव्हतं. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईला परत गेले होते. मुंबईमध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग (CM Helicopter's Emergency Landing in Mumbai) करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर मुंबईतून आता पुन्हा साताऱ्याच्या दिशेनं निघाले.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचचे मुळ गाव असून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर दरे त्यांच्या मुळगावी जाणार आहेत.त्यांचा मुक्काम हा तीन दिवस दरे येथेच असणार आहे.ते या भागातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी करणार आहेत.व काही शेतकऱ्यांच्या शेतावर ते स्वता बांबू लागवड करतील. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर लँड झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेथून पुढचा प्रवास गाडीने केला, अशी माहिती समोर येत आहे.